उल्हासनगरमध्ये रस्ता खोदकामादरम्यान जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया, नागरिकांमध्ये संताप
View this post on Instagram
उल्हासनगरमधील गोल मैदान परिसरात रस्ता खोदकाम सुरू असताना मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना समोर आली आहे. आधीच खराब रस्ते, वाढते तापमान आणि पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असताना आता जलवाहिनी फुटल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला आहे. विशेष म्हणजे, जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असतानाही दुरुस्तीचे काम तातडीने सुरू न झाल्याने स्थानिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष करणाऱ्या नागरिकांसमोर अशा प्रकारे पाण्याची नासाडी होत असल्याने जबाबदारांवर कारवाईची मागणी होत आहे.





