Navi mumbai : नवी मुंबईतील तुर्भे कचरा प्रकल्पावरून संघर्ष तीव्र; नगरसेवक सुरेश कुलकर्णी आमरण उपोषणावर
नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील कचरा साठवण प्रकल्पाचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. तुर्भे येथील कचरा साठवण जागेवर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प प्रस्तावित असताना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, प्रदूषणाचा वाढता धोका आणि परिसरातील पर्यावरणीय परिणाम लक्षात घेता हा कचरा प्रकल्प तसेच प्रस्तावित ऊर्जा निर्मिती प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. यासाठी पालिका प्रशासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
याच निषेधार्थ स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी आमरण उपोषण सुरू केले असून, जोपर्यंत दोन्ही प्रकल्प या ठिकाणाहून स्थलांतरित होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे आता या आंदोलनाकडे संपूर्ण नवी मुंबईचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram





