ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

स्वच्छतेसाठी समर्पित करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची सेवा हीच खरी देशसेवा: श्रीमती अमृता देवेंद्र फडणवीस

0Points

स्वच्छतेसाठी समर्पित करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची सेवा हीच खरी देशसेवा: श्रीमती अमृता देवेंद्र फडणवीस

मुंबईला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नवनवीन प्रयोगांमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे: अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी

स्वच्छतेच्या कामकाजासोबत विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सन्मान’

मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी हाती झाडू घेऊन झटणाऱ्या हजारो हातांमुळे या महानगराचे सौंदर्य अबाधित आहे. स्वच्छतेसाठी स्वतःला समर्पित करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची सेवा ही खरी देशसेवा आहे, अशी भावना श्रीमती अमृता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

स्वच्छतेच्या कामकाजासोबतच विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्य-कर्तृत्वाने ठसा उमटविणाऱ्या १३ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदीर येथे काल (दिनांक १७ जून २०२६) गौरव करण्यात आला. यावेळी श्रीमती फडणवीस बोलत होत्या.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अभिनेता श्री. सोनू सूद, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, उपआयुक्त (परिमंडळ ३) श्री. विश्वास मोटे, संपादक श्री. पराग करंदीकर, सहायक आयुक्त (एच पश्चिम विभाग) श्री. दिनेश पल्लेवाड, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) श्री. विनायक भट, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी म्हणाल्या, मुंबई महानगराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात तसेच विविध उपाययोजना केल्या जातात. पिंक आर्मीच्या माध्यमातून दुसऱ्या सत्रात स्वच्छता केली जाते. समूह स्वच्छता, सखोल स्वच्छतासारखे उपक्रम राबविले जातात. घनकचरा व्यवस्थापन नियम लागू होण्यापूर्वीच विशेष काळजीयोग्य कचऱ्याच्या संकलनासाठी नागरिकांना ‘येलो बॅग’ उपलब्ध देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. सुमारे ७ हजार टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावली जाते. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे आणि योगदानामुळे हे शक्य होते, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

अभिनेता श्री. सोनू सूद म्हणाले की, मुंबईला अविरतपणे स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र झटणारे स्वच्छता कर्मचारी हे खरे नायक (रियल हिरो) आहेत. या देशाची स्पंदने आणि प्रत्येकाच्या हृदयाचे स्पंदन हे स्वच्छता कर्मचारी आहेत. त्यांचा अशाप्रकारे

 

View this post on Instagram

 

A post shared by Gallinews Marathi (@gallinewsmarathi)

What's your reaction?