ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकारण

‘टायगर ऑपरेशन’ची माहिती नाही; शिवसेनेचा खरा टायगर एकनाथ शिंदे – ज्योती वाघमारे

0Points

Jalna: ‘टायगर ऑपरेशन’ची माहिती नाही; शिवसेनेचा खरा टायगर एकनाथ शिंदे – ज्योती वाघमारे

आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक आहोत. ‘ऑपरेशन टायगर’ आणि इतर कोणत्याही संदर्भात आम्हाला कोणतीही माहिती नसून त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे खासदार ज्योती वाघमारे यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आम्हाला ‘ऑपरेशन टायगर’ची माहिती नाही; मात्र शिवसेनेचा खरा टायगर म्हणजे एकनाथ शिंदे आहेत, हे निश्चितपणे माहित आहे. अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

तसेच विरोधक विनाकारण बोंबाबोंब करत असून त्यांनी तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा प्रत्युत्तर कसे द्यायचे हे शिवसैनिकांना चांगलेच माहित आहे, असा थेट इशाराही ज्योती वाघमारे यांनी दिला.

*ज्योती वाघमारे ऑन संजय राऊत*

उबाठा गटातील खासदारांना 15 कोटी रुपये अॅडव्हान्स देण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना ज्योती वाघमारे म्हणाल्या की, माणुसकीला किंमत असते हे उबाठा आणि संजय राऊत यांना समजलेले नाही. माणसे पैशाने विकत घेता येत नसतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बाईट : ज्योती वाघमारे, खासदार

What's your reaction?