Chhatrapati Sambhajinagar : समृद्धी महामार्गावर ठाकरे गटाचा रास्ता रोको; कांद्याच्या प्रश्नावर सरकारला घेरलं
राज्यात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. अनेक ठिकाणी कांदा फेकून देणे आणि कांद्याला आग लावण्याच्या घटना समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कांद्याला वाढीव दर मिळावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरलगतच्या समृद्धी महामार्गावर ठाकरे गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
View this post on Instagram




