YAVATMAL | भरधाव टिपरची भीषण धडक; पती-पत्नींसह होमगार्डची तयारी करणाऱ्या तरुणाला उडवले, दोघे जागीच ठार
यवतमाळ : जिल्ह्यातील पुसद-माहूर रोडवरील डम्पिंग ग्राउंडजवळ भरधाव टिपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात अरविंद राठोड (रा. कोठारी) व गणेश जाधव या तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिता राठोड या महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत गणेश जाधव हा होमगार्डची तयारी करीत असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.




