Uncategorized

Bhiwandi : माहिती अधिकारात माहिती न मिळाल्याने सामाजिक कार्यकर्त्याचे भिवंडीत मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन

0Points

Bhiwandi : माहिती अधिकारात माहिती न मिळाल्याने सामाजिक कार्यकर्त्याचे भिवंडीत मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन

Anc : यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयाकडून माहितीच्या अधिकारात मागवलेली माहिती न मिळाल्याने त्रस्त झालेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याने भिवंडीत मोबाईल टॉवरवर चढून अनोखे आंदोलन सुरू केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर येथील सामाजिक कार्यकर्ते शाम मारोती गायकवाड यांनी हे आंदोलन सुरू केले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

दिग्रस तालुक्यातील इसापूर ग्रामपंचायत कार्यालयाकडे ध्वजारोहणाची माहिती, नमुना आठची कागदपत्रे आणि चोरी गेलेल्या दप्तरासंदर्भातील कारवाईची माहिती मागवण्यात आली होती. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही माहिती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. गावाचा नकाशा उपलब्ध नसल्यामुळे स्वतःच्या घराची नोंद त्यांच्या नावावर होत नसल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

याविरोधात बुधवारी सकाळी भिवंडी-कल्याण मार्गावरील पिंपळास गाव हद्दीतील बीएसएनएलच्या सुमारे दोनशे पन्नास फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून त्यांनी आंदोलन सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, शाम गायकवाड यांनी यापूर्वीही अशाच प्रकारची आंदोलने केल्याची माहिती यवतमाळ पोलिसांकडून मिळाल्याचे भिवंडी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सांगितले.

बाईट : शशिकांत बोराटे
पोलिस उपायुक्त, भिवंडी

What's your reaction?