ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

AMRAVATI | पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन; मेलोडी चॉकलेट वाटून अनोखा निषेध

0Points

AMRAVATI | पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन; मेलोडी चॉकलेट वाटून अनोखा निषेध

ANC – देशभरात वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात अमरावती शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जयस्तंभ चौकात आंदोलन करण्यात आले. चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये तब्बल ८ रुपयांची वाढ झाल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

यावेळी नागरिकांना मेलोडी चॉकलेट वाटप करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला. “महागाईची गोड गोळी देऊन सरकार जनतेची फसवणूक केली आहे. मेलोडी खावं खुद जान जाओ अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करून पंतप्रधान मोदी यांच्या विदेश वारी वर सुद्धा टीका करण्यात आली.आंदोलनादरम्यान भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

BYTE – डॉ. अर्चना आत्राम, काँग्रेस नगरसेविका
BYTE – जयश्री वानखडे, महिला अध्यक्ष काँग्रेस

What's your reaction?