Uncategorized

बुलढाण्यात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त जल्लोष; जयस्तंभ चौकात रात्री फटाक्यांची आतषबाजी 

0Points

बुलढाण्यात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त जल्लोष; जयस्तंभ चौकात रात्री फटाक्यांची आतषबाजी

छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती बुलढाणा शहरात मोठ्या उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरी केली जाते, आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन या जयंतीच्या निमित्ताने केले जाते. बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा आणि स्मारक उभारण्यात आल आहे, याच स्मारकासमोर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून रात्री बारा वाजता जल्लोष करत फटाक्यांची मोठी आतिषबाजी करण्यात आली. यावेळी लेझर लाईट आणि आकर्षक विद्युत रोशनाई देखील करण्यात आली होती, यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. तर आज दिवसभर विविध कार्यक्रमाच आयोजन असून, सायंकाळी बुलढाणा शहरातून हत्ती, घोडे, उंट आणि विविध पथकासह भव्य मिरवणूक काढली जाणार आहे.

What's your reaction?