डोंबिवलीत घर देण्याच्या आमिषाने दोनशे जणांची फसवणूक; तब्बल चार कोटी रुपयांचा गंडा
View this post on Instagram
डोंबिवलीत घर देण्याच्या आमिषाने सुमारे दोनशे नागरिकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संरक्षण विभागाच्या जागेवर अनधिकृतरीत्या घरे उभारून नागरिकांकडून तब्बल चार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सचिन सुर्वे आणि मनोज धुमाळ या दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना एकोणीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून आर्थिक व्यवहार, जागेची कागदपत्रे आणि इतर संबंधित बाबींचा सखोल तपास सुरू असून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





