Uncategorized

जनगणना – २०२७ अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी स्व-गणना सदिच्छादूत (ॲम्बेसेडर) म्हणून काम करावे, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांचे आवाहन

0Points

जनगणना – २०२७ अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी स्व-गणना सदिच्छादूत (ॲम्बेसेडर) म्हणून काम करावे, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांचे आवाहन

[ads]

 

View this post on Instagram

 

A post shared by Gallinews Marathi (@gallinewsmarathi)

• मेट्रो, रेल्वे, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी स्व-गणना संदर्भात जनजागृती करण्यास भर देण्याचे निर्देश

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘जनगणना – २०२७’ अंतर्गत स्व-गणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया प्रभावीपणे राबवावी, त्यादृष्टीने आवश्यक जनजागृती करावी. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱयांनी स्व-गणना प्रक्रियेचे सदिच्छादूत (ॲम्बेसेडर) म्हणून काम करावे. तसेच, मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी, बस स्थानक, मेट्रो, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी स्व-गणेबाबत जनजागृती करावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी केले

जनगणना – २०२७ अंतर्गत स्व- गणनेसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक ७ मे २०२६) आढावा बैठक पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, सर्व परिमंडळांचे उपायुक्त आणि सहायक आयुक्त, सहसंचालक (जनगणना) श्री. संतोष पायस, कार्यकारी आरोग्य अधिकारी (प्रभारी) डॉ. संतोष गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

जनगणना २०२७ च्या कामकाजासाठी आवश्यक कर्मचारी संख्या आणि प्रशिक्षणाच्या कामकाजाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. आतापर्यंत मुंबई शहर अंतर्गत २४ हजार २८५ आणि उपनगरात ४६ हजार ३७२ नागरिकांनी जनगणना २०२७ अंतर्गत स्वगणनेच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जनगणना – २०२७ च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत दिनांक १ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणना पार पडणार आहे. यानंतर घरयादी व घरगणनेची सुरूवात दिनांक १६ मे ते दिनांक १४ जून २०२६ या कालावधीत होणार आहे.

जनगणना – २०२७ अंतर्गत स्वगणनेच्या पहिल्या टप्प्यातील उत्तम कामगिरीच्या आधारावर दुसरा टप्पा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी चांगली मदत मिळू शकते. म्हणूनच पहिल्या टप्प्यात अधिकाधिक नागरिकांना या प्रक्रियेचा भाग करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेचे सदिच्छादूत (ॲम्बेसेडर) म्हणून जबाबदारी स्वीकारावी. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्र (CFC), विविध आस्थापना कार्यालये, प्रशासकीय विभाग कार्यालये याठिकाणी स्व-गणनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी व्यापक

What's your reaction?