ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

Navi Mumbai : नवी मुंबईत पुन्हा गुलाबी पाहुण्यांचे आगमन; नेरुळच्या खाडी परिसरात रोहित पक्ष्यांचा मनमोहक वावर

0Points

Navi Mumbai : नवी मुंबईत पुन्हा गुलाबी पाहुण्यांचे आगमन; नेरुळच्या खाडी परिसरात रोहित पक्ष्यांचा मनमोहक वावर

नवी मुंबईतील नेरुळ येथील निवासी संकुलाच्या मागील खाडी परिसरात पुन्हा एकदा रोहित पक्ष्यांचे आगमन झाले असून नागरिकांना निसर्गाचा मनमोहक आविष्कार अनुभवायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने हे स्थलांतरित पक्षी दाखल झाल्याने परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.

सकाळच्या आणि सायंकाळच्या वेळेत खाडी परिसरात गुलाबी रंगाच्या रोहित पक्ष्यांचे थवे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. छायाचित्रकार, पक्षीप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींसाठी हा परिसर विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

पर्यावरणप्रेमींनी या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी खाडी परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले असून, पक्षीनिरीक्षणासाठी येणाऱ्या नागरिकांनी आवाज आणि प्रदूषण टाळून निसर्गाचा आनंद घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Gallinews Marathi (@gallinewsmarathi)

What's your reaction?