Navi mumbai : देशाची आर्थिक परिस्थिती बिघडल्याचा सुप्रिया सुळे यांचा दावा; ८ जूनला पक्षाची महत्त्वाची बैठक
Anc : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. देशाची आर्थिक स्थिती बिघडली असून विविध क्षेत्रांमध्ये त्याचे परिणाम जाणवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पक्षाच्या आगामी वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ८ जून रोजी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. १० जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन साजरा होणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.





