NAVI MUMBAI : तुर्भे डंपिंग ग्राउंड प्रश्न चिघळला; संतप्त नागरिकांनी कचरा गाड्यांची हवा काढून वाहने रोखली
नवी मुंबईतील तुर्भे डंपिंग ग्राउंड आणि प्रस्तावित कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक नागरिकांचे आंदोलन तीव्र झाले आहे. स्थानिक नगरसेवक Suresh Kulkarni यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणानंतर आता संतप्त नागरिकांनी डंपिंग ग्राउंडकडे जाणाऱ्या कचरा वाहतूक गाड्या अडवून त्यांच्या चाकांतील हवा काढली. प्रशासनाकडून अद्याप कोणतेही लेखी आश्वासन न मिळाल्याने आंदोलन आणखी चिघळले आहे.
तुर्भे डंपिंग ग्राउंड आणि प्रस्तावित कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प स्थलांतरित करण्यात यावा, या मागणीसाठी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत.कालपासून नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी आमरण उपोषण सुरू केले असून प्रशासनाशी चर्चा होऊनही कोणताही तोडगा निघालेला नाही.
यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी डंपिंग ग्राउंडमध्ये कचरा घेऊन जाणाऱ्या वाहनांना अडवले. काही वाहनांच्या चाकांमधील हवा काढून गाड्या डंपिंग ग्राउंडच्या बाहेरच रोखून धरल्या.या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कचरा वाहतूक विस्कळीत झाली आहे.आता या प्रश्नावर महापालिका प्रशासन काय भूमिका घेणार आणि आंदोलनकर्त्यांशी कोणता तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram





