ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

NASHIK | मुख्यमंत्र्यांच्या कांदा घोषणेबाबत शेतकऱ्यांची नाराजी……“ कांद्याला 2 हजार रुपये भाव द्यावा, शेतकरी दांपत्यांची मागणी…

0Points

NASHIK | मुख्यमंत्र्यांच्या कांदा घोषणेबाबत शेतकऱ्यांची नाराजी……“ कांद्याला 2 हजार रुपये भाव द्यावा, शेतकरी दांपत्यांची मागणी…

ANC – निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कांद्याच्या १२ रुपये ३५ पैसे दराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा दर अत्यंत अपुरा असून किमान २० रुपये प्रति किलो किंवा दोन हजार रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सध्या कांद्याला बाजारात अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बियाणे, खत, औषधे, मजुरी, वीज, पाणी तसेच वाहतूक यासाठी लाखो रुपये खर्च करूनही उत्पादन खर्च निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.“किमान २० रुपये किलो दर मिळाल्यास तरी उत्पादन खर्च निघेल. अन्यथा कांदा शेती करणे अशक्य होईल,” अशी भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Gallinews Marathi (@gallinewsmarathi)

What's your reaction?