Kalyan: ‘थोडी तरी अक्कल वापरा, नाहीतर जेलमध्ये टाकून देईन’; श्रीकांत शिंदेंचा संताप
View this post on Instagram
ANC: डोंबिवलीतील कॅन्सर रुग्णालयाच्या प्रकल्पस्थळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली. प्रकल्पस्थळी निर्माण झालेली परिस्थिती पाहून त्यांनी संबंधित कंत्राटदारावर संताप व्यक्त केला.
कॅन्सर रुग्णालयाच्या कामात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करत, भिंत कोसळल्याच्या घटनेनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी कंत्राटदाराला कडक शब्दांत इशारा दिला.
“थोडी तरी अक्कल वापरा, नाहीतर जेलमध्ये टाकून देईन,” अशा शब्दांत त्यांनी संबंधित कंत्राटदाराला सुनावल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
