ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

CHANDRAPUR | सिंदेवाहीत वाघाचा थरारक हल्ला; तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा मृ-त्यू

0Points

CHANDRAPUR | सिंदेवाहीत वाघाचा थरारक हल्ला; तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा मृ-त्यू

ANC : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांवर वाघाने हल्ला करून त्यांचा बळी घेतल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त गावकऱ्यांनी मृतदेह उचलण्यास विरोध करत वन विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच वन विभाग व पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून गावकरीही पुन्हा गावात परतले आहेत.
गावकऱ्यांनी वाघाला तातडीने जेरबंद करावे, मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी द्यावी, तेंदूपत्ता संकलनावेळी वन कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवावी तसेच गावाभोवती रात्री गस्त वाढवावी, अशा प्रमुख मागण्या केल्या होत्या. वन विभागाने या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याने तणाव निवळला आहे.

मृत महिलांची नावे
कवडूबाई दादाजी मोहुर्ले (वय 45)
अनुबाई दादाजी मोहुर्ले (वय 46)
संगीता संतोष चौधरी (वय 36)
सुनीता कौशिक मोहुर्ले (वय 33)

गावकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
-वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा
-मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी द्यावी
-तेंदूपत्ता संकलनावेळी वन कर्मचारी सोबत असावेत
-गावाभोवती रात्री गस्त वाढवावी

 

What's your reaction?