BULDHANA | कांद्याला 1580 रुपये दर म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने; रविकांत तुपकर यांची सरकारवर टीका
ANC – नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने 1580 रुपये निर्धारित मूल्य घोषित करून तसा अध्यादेश काढला आहे.. मात्र यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा काहीच फायदा होणार नाही.. कांद्याचा एक क्विंटलचा उत्पादन खर्च 1700 ते 1800 रुपये आहे आणि सरकारने 1580 रुपये निर्धारित मूल्य ठरवून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.. कांद्यावरील निर्यात बंदी हटवून जास्तीत जास्त कांदा सरकारने निर्यात करावा, आणि दोन ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल कांदा सरकारने खरेदी करावा अशी मागणी देखील रविकांत तुपकर यांनी केली आहे.





