ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकारण

BHIVANDI : भिवंडीत लूम कारखाना कोसळला; दोन कामगार किरकोळ जखमी, धोकादायक इमारतींकडे महापालिकेचे दुर्लक्ष?

0Points

BHIVANDI : भिवंडीत लूम कारखाना कोसळला; दोन कामगार किरकोळ जखमी, धोकादायक इमारतींकडे महापालिकेचे दुर्लक्ष?

 

View this post on Instagram

 

A post shared by Gallinews Marathi (@gallinewsmarathi)

ANC : भिवंडी शहरातील गायत्रीनगर परिसरात लूम कारखाना कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन कामगार किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. धोकादायक इमारतीची नोटीस बजावूनही कारखाना सुरू असल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
भिवंडीतील गायत्रीनगर परिसरातील फातिमानगर येथे शंभर फुटी रस्त्यालगत न्यू आजमी कंपाऊंडमधील ताज हॉटेलजवळ असलेला यू. एस. टेक्स्टाईल नावाचा लूम कारखाना अचानक कोसळला. हा कारखाना सलमा अन्वर खान यांच्या मालकीचा असल्याची माहिती आहे.
दुर्घटनेच्या वेळी कामगारांची जेवणाची वेळ असल्याने अनेक कामगार बाहेर गेले होते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, या दुर्घटनेत दोन कामगार किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या परिसरातील अनेक कारखान्यांना महापालिकेने धोकादायक इमारतींच्या नोटिसा बजावल्या होत्या. तरीही संबंधित कारखाने सुरूच असल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित कारखाने अनधिकृत असल्याचाही दावा करण्यात येत आहे.
या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त सपना वसावा यांनी सांगितले की, धोकादायक आणि अनधिकृत कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक कारखानामालक कारखाने खाली करत नसल्याने आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

 

What's your reaction?