ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

BARAMATI | कृषिमंत्र्यांच्या इंदापूर तालुक्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; पुणे–सोलापूर महामार्ग रोखला

0Points

BARAMATI | कृषिमंत्र्यांच्या इंदापूर तालुक्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; पुणे–सोलापूर महामार्ग रोखला

कृषिमंत्र्यांच्या तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळत असून, शेतकरी आक्रमक होत पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उतरले आहेत.

इंदापूर तालुक्यात खडकवासला उजव्या कालव्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन अद्याप मिळाले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काल पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डाळज नंबर दोन चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

खडकवासला कालव्याचे उन्हाळी हंगामातील दुसरे पाणी आवर्तन इंदापूर तालुक्याला अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे आधीच पाण्याअभावी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर आज इंदापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले आणि पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डाळज नंबर दोन चौकात रास्ता रोको आंदोलन छेडले. आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंवरील वाहतूक ठप्प झाली होती.

“शेतकऱ्यांना तात्काळ पाणी द्या”, “उन्हाळी आवर्तन सुरू करा” अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला.

प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Gallinews Marathi (@gallinewsmarathi)

What's your reaction?