ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

पर्यावरणाचे संतुलन राखून हरित, सुरक्षित, निरोगी मुंबई घडवूया!

0Points

पर्यावरणाचे संतुलन राखून हरित, सुरक्षित, निरोगी मुंबई घडवूया!

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित ‘क्रीडा व हवामान – एक महत्त्वपूर्ण संवाद’ चर्चासत्रातील सूर

महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू श्री. ए. बी. डिव्हिलियर्स, सिने अभिनेत्री श्रीमती दिया मिर्झा आदींचा चर्चासत्रात सहभाग

आंतरराष्ट्रीय महानगर असलेल्या मुंबईमध्ये विकासाकडे धाव घेत असताना पर्यावरणाचे संतुलन राखून भावी पिढ्यांसाठी अधिक हरित, सुरक्षित, निरोगी आणि हवामान बदलाला सामोरी जाणारी मुंबई घडवूया, असा सूर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज (दिनांक ५ जून २०२६) आयोजित ‘क्रीडा व हवामान – एक महत्त्वपूर्ण संवाद’ या विषयावरील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला.

महानगरपालिकेचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या प्रांगणात सायंकाळी हे चर्चासत्र पार पडले.

या चर्चासत्रात महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, दक्षिण आफ्रिकेचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू श्री. ए. बी. डिव्हिलियर्स, सिने अभिनेत्री तथा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छा दूत श्रीमती दिया मिर्झा, प्रोकॅम इंटरनॅशनलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. विवेक सिंग, प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक श्री. शिशिर जोशी यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन पत्रकार श्रीमती रिचा पिंटो यांनी केले.

चर्चासत्रात सहभागी तज्ज्ञांनी प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चासत्राच्या आधी प्रोजेक्ट मुंबईद्वारे मुंबई क्लाइमेट वीक २०२७ ची घोषणा करण्यात आली.

महानगरपालिकेचे सभागृह नेते श्री. गणेश खणकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते तथा जी उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष श्री. हरिष भांदिर्गे, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षा श्रीमती यामिनी जाधव, बाजार व उद्यान समिती अध्यक्षा श्रीमती हेतल गाला, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग) श्री. प्रदीप गवळी, उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे म्हणाल्या, वातावरणात सातत्याने बदल होत आहे. हा बदल आपण लक्षात घेणे

 

View this post on Instagram

 

A post shared by Gallinews Marathi (@gallinewsmarathi)

What's your reaction?