ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

Beed: जिल्हा प्रशासन आणि नगरपालिकेच्या दुटप्पी भूमिकेविरोधात आंदोलन

0Points

Beed: जिल्हा प्रशासन आणि नगरपालिकेच्या दुटप्पी भूमिकेविरोधात आंदोलन

बीड शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप करत बिंदुसरा आणि करपरा नदीपात्रातील अतिक्रमणे, ओपन स्पेस गिळंकृत प्रकरणे तसेच व्यापारी संकुलातील बेकायदेशीर बांधकामांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बीडकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत हातावर पोट भरणाऱ्या चहा-नाश्ता चालक, टपरीधारक, फळविक्रेते, फुलहार विक्रेते आणि फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मात्र दुसरीकडे बिंदुसरा आणि करपरा नदीपात्रातील पुररेषेच्या आतील अतिक्रमणे, उद्यान आणि मंदिरांसाठी राखीव असलेल्या ओपन स्पेसवरील बेकायदेशीर बांधकामे तसेच व्यापारी संकुलातील अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

नगरपालिका अधिकारी, नगररचनाकार, भूमी अभिलेख कार्यालयातील काही व्यक्ती आणि भू-माफियांच्या संगनमतातून अनेक जागा गिळंकृत करण्यात आल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. बनावट पीटीआर आणि पीआर कार्ड तयार करून काही जागा स्वतःच्या नावावर करून घेतल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

“कायदा सर्वांसाठी समान असावा. गोरगरीबांवर कारवाई आणि धनदांडग्यांना संरक्षण, हे प्रशासनाचे दुटप्पी धोरण थांबले पाहिजे,” अशी मागणी आंदोलकांनी केली.

बाईट – डॉ. गणेश ढवळे, आंदोलक

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Gallinews Marathi (@gallinewsmarathi)

What's your reaction?