AMRAVATI | अमरावतीत उष्माघाताचा धोका वाढला; 4 संशयित मृ-त्यू
अमरावतीसह संपूर्ण विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघातामुळे 4 संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 21 संशयित रुग्णांनी शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेतले असून अनेक रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
दरम्यान हवामान विभागाने अमरावतीसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन सतर्क झाले असून उष्माघातग्रस्तांसाठी विशेष वातानुकूलित वॉर्ड तयार करण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
विनोद पवार यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचे, भरपूर पाणी पिण्याचे आणि उष्णतेपासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे.
BYTE :- डॉ. विनोद पवार, जिल्हा शल्य चिकित्सक अमरावती





