Chhatrapati Sambhajinagar : गोहत्येविरोधात सरकारचा कठोर इशारा; ‘मोक्का’ निर्णयाचे स्वागत
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोहत्या आणि अवैध कत्तलखान्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या निर्णयाचे भाजप नेते Sanjay Kenekar यांनी स्वागत केले आहे.
गोमातेची हत्या करणारे तसेच अवैध कत्तलखाने चालवणाऱ्यांवर मोक्का लावण्याचा इशारा देत सरकारने कठोर संदेश दिल्याचे केनेकर म्हणाले. ज्या ठिकाणी गोहत्या किंवा अवैध कत्तल सुरू असल्याची माहिती मिळेल, ती तात्काळ प्रशासन आणि सरकारपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
गोसंरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही भाजप नेते संजय केनेकर यांनी स्पष्ट केले.




