ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

Jalna : Gen Z ला समजून घ्या, नाहीतर सुनामी येईल; प्रा. लक्ष्मण हाके यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

0Points

Jalna : Gen Z ला समजून घ्या, नाहीतर सुनामी येईल; प्रा. लक्ष्मण हाके यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

जालना येथे बोलताना प्रा. लक्ष्मण हाके यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. “कॉकरोच जनता पार्टी” ही तरुणांच्या मनातील भडास व्यक्त करण्याचे माध्यम असल्याचे सांगत त्यांनी Gen Z पिढीला दुर्लक्षित केल्यास मोठा सामाजिक उद्रेक होऊ शकतो, असा इशारा दिला. डिजिटल मीडिया हातात असलेल्या बेरोजगार तरुणांमुळे देश क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचेही त्यांनी म्हटले.

“एका क्लिकवर संपूर्ण जग एकत्र आले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी तरुणांना कमी लेखू नये, अन्यथा Gen Z तुमचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करेल,” असा थेट इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला. विरोधक आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडत नसल्याची टीका करत त्यांनी सत्ताधारी लोकशाही मानत नसल्याचाही आरोप केला. तरुणांना Civic Sense देण्याची गरज असल्याचे सांगत, “जर त्यांच्याकडे योग्य दिशा नसेल तर लोकशाही आणि सत्ता परिवर्तन धोक्यात येईल,” असेही हाके म्हणाले.

नेपाळमध्ये ज्या प्रकारे उठाव झाला, तशीच परिस्थिती भारतात निर्माण होऊ शकते, असा दावाही त्यांनी केला. ग्रामीण भागातील दीन-दलित, भटक्या-विमुक्त, शेतकरी आणि बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी “लाडकी बहीण” योजनेवरही टीका केली. “वर्षाला हजारो कोटी रुपये योजनांवर खर्च केले जातात, मात्र तरुणांना रोजगार आणि नोकऱ्या दिल्या जात नाहीत,” असे ते म्हणाले. डिजिटल मीडिया हातात असलेल्या तरुणांना बेरोजगार ठेवल्यास भविष्यात मोठी क्रांती अटळ असल्याचा इशाराही प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिला.

 

What's your reaction?