Kalyan : कल्याणमध्ये अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट; महापालिकेच्या महसुलाला मोठा फटका
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत होर्डिंग्जचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाल्याचा गंभीर आरोप भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. शहरात तब्बल चारशे ते पाचशे अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आल्याने महापालिकेचा सुमारे दहा कोटी रुपयांचा महसूल बुडत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या व्यवसायात काही समाजकंटक तसेच राजकीय पक्षांशी संबंधित पदाधिकारी सहभागी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडल्यानंतरही अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच प्रभाग अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बाईट : दीपेश म्हात्रे, नगरसेवक, भारतीय जनता पक्ष
दरम्यान, केडीएमसी प्रशासनाने काही होर्डिंग्ज संदर्भातील न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असल्याने कारवाईस अडथळे येत असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना अनधिकृत होर्डिंग्जवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी दिली आहे.
बाईट : योगेश गोडसे, अतिरिक्त आयुक्त, केडीएमसी
View this post on Instagram



