Nashik: मुखेड शिवारातील विहिरीत बिबट्या पडला; वन विभाग घटनास्थळी दाखल
ANC: नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील मुखेड शिवारात शेतकरी विशाल नानासाहेब आहेर यांच्या शेतातील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना समोर आली आहे. ही बाब लक्षात येताच स्थानिक शेतकऱ्यांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला विहिरीबाहेर सुरक्षितरित्या काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
View this post on Instagram





