ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

NAVI MUMBAI : नवी मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा; महानगरपालिकेकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सतर्कतेच्या सूचना जारी

0Points

NAVI MUMBAI : नवी मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा; महानगरपालिकेकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सतर्कतेच्या सूचना जारी

राज्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून उष्णतेच्या लाटेचा धोका अधिक तीव्र होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

महानगरपालिकेच्या सूचनांनुसार क्षेत्रीय काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दुपारी बारा ते चार या वेळेत शक्यतो उन्हामध्ये काम करणे टाळावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अत्यावश्यक काम असल्यास आवश्यक खबरदारी घेऊनच कामकाज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच सकाळी अकराच्या आधी किंवा सायंकाळी चारनंतरच क्षेत्रीय कामे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

बाईट : कैलास शिंदे (नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त)

What's your reaction?