Navi mumbai : नवी मुंबईतील एपीएमसी मसाला बाजारातील दुकानाला आग; सुकामेवा माल जळून खाक
Anc नवी मुंबईतील एपीएमसी मसाला बाजारात आज आग लागल्याची घटना समोर आली आहे. मसाला बाजारातील दुकान क्रमांक बारा येथे अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्यात यश मिळवले.
या आगीत दुकानातील मोठ्या प्रमाणातील सुकामेवा आणि इतर माल जळून खाक झाला असून आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही
View this post on Instagram





