ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

SINDHUDURG : सिंधुदुर्गात बोट बांधणी प्रकल्पाला प्रारंभ; रोजगार आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार

0Points

SINDHUDURG : सिंधुदुर्गात बोट बांधणी प्रकल्पाला प्रारंभ; रोजगार आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार

 

View this post on Instagram

 

A post shared by Gallinews Marathi (@gallinewsmarathi)

ANC : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोट बांधणी प्रकल्पाला अधिकृत सुरुवात झाली असून, या प्रकल्पामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथे अत्याधुनिक बोट बांधणी कारखाना उभारला जाणार असून, यासाठी संबंधित कंपनी, महाराष्ट्र सागरी मंडळ आणि राज्य शासनाच्या बंदर विभागामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई जलवाहतूक प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पन्नास आणि शंभर प्रवासी क्षमतेच्या बोटींची निर्मिती याच कारखान्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे शंभर बोटी तयार केल्या जाणार आहेत.
या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना कौशल्य प्रशिक्षणासह रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच जहाज बांधणी, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित आणखी पर्यावरणपूरक प्रकल्प सिंधुदुर्गात आणण्याचे नियोजन असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.

 

What's your reaction?