THANE : ठाण्यात गॅस कंटेनर पलटी होऊन भीषण अपघात; रिक्षाचालकासह एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
View this post on Instagram
ANC : ठाण्यातील आनंदनगर, घोडबंदर रोड येथे गॅसचा कंटेनर पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. कंटेनरखाली रिक्षा दबली गेल्याने रिक्षाचालक आणि एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून आणखी एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. अपघातावेळी रिक्षामध्ये तीन प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून क्रेनच्या साहाय्याने गॅस कंटेनर बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली असून पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

