NAVI MUMBAI : नवी मुंबई विमानतळ नामांकरणावरून पनवेलमध्ये आंदोलन चिघळले; माजी आमदार बाळाराम पाटील ताब्यात
View this post on Instagram
ANC : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी पनवेल ते विधानभवन असा पायी मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर पनवेलमध्ये आंदोलन चिघळले. लोकनेते दि. बा. पाटील प्रेमी नामांकरण संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या आंदोलनात खासदार बाळ्यामामा पाटील आणि माजी आमदार बाळाराम पाटील सहभागी झाले होते. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी करत पोलिसांच्या वाहनांचा मार्ग रोखला. आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. या गोंधळात दोन महिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अनेक आंदोलकांना उचलून वाहनांमध्ये बसवत ताब्यात घेतले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
