SATARA : भटक्या-विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरण; कारवाईच्या मागणीसाठी साताऱ्यात निवेदन
भटक्या-विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी साताऱ्यात नवसंघर्ष सामाजिक पार्टीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. संस्थापक अध्यक्ष निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने संबंधित व्यक्तीविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. समाजाची बदनामी करणारे आणि तेढ निर्माण करणारे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याने संताप व्यक्त करण्यात आला. पुढील चार ते पाच दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
View this post on Instagram
